पाकमध्ये रेल्वेत चढण्यापासून भारतीय महिलांना रोखलं
एबीपी माझा वेब टीम | 27 Sep 2016 10:32 AM (IST)
लाहोरः पाकिस्तानच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी कागदपत्रांच्या तपासणीसाठी दिल्लीला जाणाऱ्या समझोता एक्स्प्रेसमध्ये चढण्यापासून रोखलं. अनेकदा विनंती करुनही अधिकाऱ्याने कागदपत्रांवरुन अडवणूक केली, असं भारतीय महिलेने म्हटलं आहे. समझोता एक्स्प्रेस लाहोर ते दिल्ली या मार्गावर आठवड्यातून दोन वेळा चालवण्यात येते. कागदपत्र अपूर्ण असल्याचं सांगत अडवणूक केल्याने महिलांकडून वाघा रेल्वे स्टेशनवर रेल्वे अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करुन महिला भारतात जाऊ शकतात, असं अधिकाऱ्य़ाने सांगितलं.