भारतासह पाच देशांचा बहिष्कार
भारत, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेशने याआधी सार्क परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर श्रीलंकेनेही या परिषदेवर बहिष्कार टाकला. त्यामुळे पाकिस्ताननेच सार्क परिषद पुढे ढकलण्यात आली.
दक्षिण आशियाई देशांकडून भारताच्या भूमिकेचं समर्थन
उरीतल्या लष्कराच्या तळावर हल्ला केल्यानंतर भारताने सार्क परिषदेवर बहिष्कार घातला होता. त्यानंतर दक्षिण आशियाई देशांनी भारताच्या भूमिकेचं समर्थन केलं. पाकिस्तानला एकाकी पाडण्याच्या भारताच्या प्रयत्नाला यश आल्याचे दिसून येते आहे.
भारताचा सर्जिकल स्ट्राईक
उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी 27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय लष्कराच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली.
संबंधित बातम्या