ज्या दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला, त्यांचे मृतदेह गुपचूप दफन करण्याचं काम पाकिस्तानात सुरु आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी याबाबातची माहिती दिली.
तसंच लष्कर ए तैयबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि जैश्न ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर यांना गप्प राहण्याचेही आदेश देण्यात आलेत.
डोग्रा आणि बिहार रेजिमेंटची कारवाई
ज्यांनी आपल्या 20 साथिदारांना गमावलं, ज्यांनी उरी हल्ल्याची भळभळती जखम घेऊन इतके दिवस प्रतीक्षा केली, त्याच जवानांनी आपल्या मित्रांच्या बलिदानाचा बदला घेतला.
ज्या भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक यशस्वी केलं, त्या जवानांमध्ये डोग्रा रेजिमेन्ट आणि बिहार रेजिमेन्टच्या जवानांचा समावेश होता.
चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात
पाक व्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या धडक कारवाईमध्ये डोग्रा रेजिमेन्ट आणि बिहार रेजिमेन्टच्या जवानांनी लीड केल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सर्वाधिक शहीद हे बिहार आणि डोग्रा रेजमेंटचे होते. त्यामुळे आपल्या साथिदारांचा जीव घेणाऱ्या अतिरेक्यांचा खात्मा करण्याची जबाबदारी लष्कराने डोग्रा आणि बिहार रेजिमेटन्वर दिली.
27 आणि 28 तारखेच्या मध्यरात्री या दोन्ही रेजिमेन्टच्या जवानांनी अतिरेक्यांच्या 7 तळांवर चढाई केली. आणि आपल्या साथिदारांच्या बलिदानाचा बदला घेतला. त्यांनी आपले 20 जवान धारातीर्थी पाडले... पण आपल्या सैनिकांनी त्यांच्या 40 जणांचा खात्मा केला.
उरी हल्ला
जम्मू काश्मीरमधील उरी इथं 18 सप्टेंबर रोजी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी 10 डोग्रा रेजिमेंटच्या बटालियन मुख्यालयावर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांची संख्या आज 20 वर पोहोचली आहे.
भारताचं सर्जिकल स्ट्राईक
उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी 27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय लष्कराच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली.
संबंधित बातम्या :
होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात
वाघा बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट 2 ऑक्टोबरपर्यंत रद्द
पाकमधील भारतीय उच्चायुक्तांना पाक परराष्ट्र मंत्रालयाचं बोलावणं
मोदी आणि भारतीय जवानांकडून पितृपक्षात पाकचं श्राद्ध : राज ठाकरे
सर्जिकल स्ट्राईक: भारतीय जवान नेमके कसे घुसले?
भारत-पाक युद्ध झाल्यास… दोन्ही देशांची शस्त्रसज्जता किती?
ही कारवाई उरी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली, कुटुंबीयांची भावना
भारत कणखर, मोदींचा अभिमान, मुख्यमंत्र्यांचं ट्वीट
अभिनंदन मोदीजी… उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन
काश्मीर मांगो गे तो चीर देंगे, भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष
फोटो : भारतीय लष्कराचा अभिमान वाटतो: अक्षय कुमार
फोटो : सर्जिकल स्ट्राईक: असा घेतला उरीचा हल्ल्याचा बदला!
फोटो : भारत कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्जः डीजीएमओ
सर्जिकल स्ट्राईक: डोग्रा आणि बिहार रेजिमेंटने बदला घेतला !