मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पत्रकाराने राष्ट्राध्यक्षांना थेट लग्नाविषयी छेडलं असता पुतिन यांनी 'सभ्य व्यक्ती म्हणून एक ना एक दिवस नक्की लग्न करेन' असं पुतिन म्हणाले.
प्रत्येकाने विवाह केलाच पाहिजे आणि आयुष्यभर विरुद्धलिंगी जोडीदारासोबत राहिलं पाहिजे, हा रशियन जनमानसातील सर्वसाधारण समज आहे. पुतिन यांनी एकप्रकारे या समजाला पाठिंबाच दिल्याचं म्हटलं जातं. संयुक्त राष्ट्रसंघांच्या मानवी हक्क परिषदेत रशिया पारंपरिक मूल्यांबाबत आग्रही राहिली आहे.
'पारंपरिक मूल्यां'ची जोपासना करताना रशियाने समलिंगी नातेसंबंधांवर बंदी घातली आहे. लहान मुलांसोबत समलैंगिकतेबाबत चर्चा करणंही अवैध ठरवण्यात आलं आहे. रशियात लग्नाचं मूळ उद्दिष्ट मूल जन्माला घालणं हे आहे.
66 वर्षीय पुतिन यांचा 1983 साली म्हणजे वयाच्या 31 व्या वर्षी विवाह झाला होता. मात्र 31 वर्षांच्या संसारानंतर 2014 मध्ये पुतिन पत्नी ल्युदमिला यांच्यापासून ते विभक्त झाले.
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची पुन्हा विवाहबंधनात अडकण्याची इच्छा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Dec 2018 11:54 AM (IST)
66 वर्षीय पुतिन यांचा 1983 साली म्हणजे वयाच्या 31 व्या वर्षी विवाह झाला होता. मात्र 31 वर्षांच्या संसारानंतर 2014 मध्ये पुतिन पत्नी ल्युदमिला यांच्यापासून ते विभक्त झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -