Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील युद्धांला आता 100 हून अधिक दिवस उलटले आहेत. यांच्यातील युद्ध अद्याप कायम असून त्याचा परिणाम इतर देशांवरही होत आहे. युद्धामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेले भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. विद्यार्थांना त्यांचे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पण आता युक्रेनहून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. रशियन विद्यापिठात भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. नवी दिल्लीतील रशियन दुतावासाचे अधिकारी रोमन बाबुश्किन यांनी सांगितलं आहे की, युक्रेनहून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना रशियन विद्यापिठात प्रवेश देण्यात येईल.


बाबुश्किन यांनी सांगितलं आहे की, युक्रेनहून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना रशियन विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जाईल. तिथे विद्यार्थी त्यांचे संबंधित अभ्यासक्रम सुरू ठेवू शकतील. यामुळे विद्यार्थ्यांना मागील वर्षांत केलेल्या अभ्यासामध्ये नुकसान सहन करावं लागणार नाही. या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनमधून परतलेल्या 20,000 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.


रशियन फेडरेशनचे मानद राजदूत आणि तिरुअनंतपुरममधील रशियन हाऊसचे संचालक रतीश सी. नायर यांनी सांगितलं की, ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे, त्या विद्यार्थ्यांना रशियन विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये दिले जाणारी शिष्यवृत्तीचे शुल्क रशियामधील अभ्यास करण्यासाठी पुरेशी नाही.


विद्यार्थी रशियन हाऊसशी संपर्क साधू शकतात
नायर यांनी पुढे सांगितलं की, केरळमधील विद्यार्थी त्यांच्या गुणपत्रिका आणि इतर कागदपत्रांसह रशियन हाऊसमध्ये जाऊ शकतात. तिथे विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड रशियन विद्यापीठांना पाठवले जातील. यानंतर ते विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संपर्क साधतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI