Russia Ukraine Crisis : रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरुच आहेत. यादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी युरोपिय संघामध्ये (EU) प्रवेश करण्याच्या अर्जावर स्वाक्षरी केली आहे. युक्रेनच्या संसदेने ही माहिती दिली. एवढेच नाही तर युक्रेनने याला ऐतिहासिक क्षण म्हटले आहे. दुसरीकडे, युक्रेनचे पंतप्रधान डेनिस श्मिगल म्हणाले की, 'ही युक्रेन आणि तेथील नागरिकांची निवड आहे. आम्ही यापेक्षा अधिक पात्र आहोत.' सदस्यत्व मान्य झाल्यास युक्रेनला याचा मोठा फायदा होणार आहे कारण रशियाविरोधातील लढाईत युक्रेनला युरोपिय संघातील देशांची मदत मिळेल.


युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यावर युरोपीय संघाने रशियावर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर युरोपियन संघाने रशियावर सर्व प्रकारचे निर्बंध लादण्याची घोषणा केली. रशियाची बँकिंग प्रणाली स्विफ्टमधून बाहेर काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय रशियन विमानांसाठी तिची हवाई हद्दही बंद करण्यात आली आहे.


रशियन हल्ल्यात 16 मुलांसह 352 ठार
युक्रेनने संयुक्त राष्ट्रांच्या आपत्कालीन सत्रात सांगितले की, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 16 मुलांसह 352 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. रशियाकडून हल्ले सुरूच आहेत. या युद्धात रशियन सैनिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. हजारो रशियन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. युक्रेनवरचा हा हल्ला थांबवा. आम्ही रशियाला आपले सैन्य बिनशर्त माघार घेण्याचे आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha