Russia Ukraine War : रशियाकडून युक्रेनवरील हल्ले अद्यापही सुरुच आहेत. आता पुन्हा एकदा रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेननं म्हटलं आहे की, रशियाने सोमवारी किव्हमधील क्रेमेनचुक मॉलला लक्ष्या केल्याचं म्हटलं आहे. युक्रेनने दावा केला आहे की, रशियनाने क्षेपणास्त्राद्वारे क्रेमेनचुक मॉलच्या इमारतीवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 16 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामध्ये 59 जण जखमी झाले आहेत. 25 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


युक्रेनच्या आपत्कालीन प्रमुख अधिकारी सर्गेई क्रुक यांनी मंगळवारी सकाळी या दुर्घटनेबाबतची अधिक माहिती दिली आहे. सर्गेई क्रुक यांनी सांगितलं आहे की 'या दुर्घटनेत आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाला आहे, 59 लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी 25 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. '


आगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल






सोमवारी शॉपिंग सेंटरवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर आग विझवणे, मदत कार्य, ढिगारा हटवण्याचं काम सुरु आहे. याआधी 'द कीव्ह इंडिपेंडंट'च्या वृत्तानुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी त्यांच्या टेलिग्रामवर लिहिलं की, 'रशियाने क्रेमेनचुकमधील शॉपिंग सेंटरवर क्षेपणास्त्र हल्ला केला. यावेळी एक हजाराहून अधिक लोक मॉलमध्ये होते. मॉलला आग लागली, अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत, बळींच्या संख्येची कल्पना करणं अशक्य आहे.'


बळींच्या संख्येची कल्पना करणं अशक्य : झेलेन्स्की


कीव्ह इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरून याबाबत माहिती दिली आहे. 'रशियाने क्रेमेनचुकमधील शॉपिंग सेंटरवर हल्ला केला आहे. या शॉपिंग सेंटरमध्ये एक हजाराहून अधिक लोक होते. या मॉलला आग लागली असून अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत, बळींच्या संख्येची कल्पना करणं अशक्य आहे." असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या