Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेची फेरी होणार आहे. यासाठी रशियाचे शिष्टमंडळ बेलारुसमध्ये पोहोचला आहे. रशियाला युद्धामध्ये बेलारुसकडून मोठी मदत मिळत आहे. यामुळे रशियाने युक्रेनवर चारही बाजूंनी हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता रशियाचे शिष्टमंडळ युक्रेनशी चर्चेसाठी बेलारूसमध्ये दाखल झाले आहे.
क्रेमलिनच्या प्रवक्त्याने इफॅक्स वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. रशियाने फेब्रुवारी 24 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला सुरू केल्यानंतर ही पहिली फेरी होणार आहे. रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, 'रशियन शिष्टमंडळात परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालये आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या कार्यालयातील अधिकारी समाविष्ट दाखल झाले आहेत आणि ते युक्रेनियन समकक्षांच्या आगमनाची वाट पाहत आहेत. ही फेरी बेलारुसमधील शहर गोमेलमध्ये होत आहे.
दरम्यान, युक्रेन-रशिया युद्धात तोफ, गोळे, बंदुकांनी सुरु असलेली ही लढत अण्वस्त्र हल्ल्यापर्यंत पोहोचू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या युद्धात बेलारूसची रशियाला खूप मदत मिळत आहे. अशा स्थितीत फ्रान्सने या प्रकरणात हस्तक्षेप करत युक्रेनविरुद्धच्या युद्धात बेलारूसने रशियाला मदत करू नये, असे म्हटले आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को (Alexander Lukashenko) यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान, त्यांनी बेलारूसच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला, ज्यामध्ये बेलारूसने रशियाला बेलारूसच्या भूमीवर अण्वस्त्रे तैनात करण्याची परवानगी दिली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : युद्धाच्या चौथ्या दिवशीही युक्रेनवर हल्ला सुरूच, दोन मोठ्या शहरांना घेरल्याचा रशियाचा दावा
- North Korea : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान उत्तर कोरियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी, दक्षिण कोरियाकडून पुष्टी
- Russia Ukraine War : युक्रेन-रशिया युद्धात आण्विक शस्त्रांचा वापर? जगभरात खळबळ; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा बेलारूसला फोन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha