Lockdown: कोरोना विषाणूननंतर (Coronavirus) चीनमध्ये (China) नव्या विषाणूचा उद्रेक होण्याच्या भितीनं चीनमधील नऊ लाख लोकसंख्या असलेल्या चांगचुंग (Changchun) शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्येच आढळून आला होता. त्यानंतर संपूर्ण जगभरात कोरोनाचं जाळं पसरलं. या भयंकर विषाणूमुळं अनेकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. यातच नव्या विषाणूमुळं चांगचुंग शहरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड भिती पसरलीय. 


चीनमध्ये 9 लाख लोकसंख्या असलेल्या चांगचुनच्या ईशान्येकडील औद्योगिक केंद्रात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. या ठिकाणी नव्या विषाणूचा प्रसार पाहता लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. चीनच्या वुहान शहरात 2019 मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर या प्राणघातक विषाणूचं संपूर्ण जगभर जाळं पसरलं. दरम्यान, कोरोनामुळे मोठ्या संख्येत लोकांनी प्राण गमावले. अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात आलेली नसताना चीनमधील नव्या विषाणूनं जगभरात दहशत निर्माण केलीय. संपूर्ण चीनमध्ये या विषाणूचे एकूण 397 प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी 98 चांगचुनच्या आसपास असलेल्या जिलिन प्रांतात सापडली आहेत. चांगचुंग शहरात फक्त दोन प्रकरणे आढळून आल्याचं वृ्त्त समोर येत आहे.


जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. अनेक युरोपीय देश आणि अमेरिकेत अजूनही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. भारतातीलही कोरोना परिस्थिती पूर्णपणे अटोक्यात आली नाही. मात्र, मागील काही महिन्यांपासून देशातील रुग्ण संख्या कमी झाली असून दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झालीय. कोरोना प्रतिबंधक लसीमुळं कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. ज्यामुळं  लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला जात आहे.  


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha