Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान गुगलने एक मोठा निर्णय घेतला आहे. गुगलने रशियाचे सरकारी माध्यम असलेल्या आरटी (RT) आणि स्पुतनिकचे (Sputnik) युट्युब (YouTube) चॅनेलवर बंदी घातली आहे. याआधी यूट्यूबने जाहिरातींच्या माध्यमातून या चॅनेलच्या कमाईवर बंदी घातली होती. खुद्द रशियन सरकारी मीडिया आरटीने ही माहिती दिली आहे.
युट्युबवर दोन्ही चॅनल ब्लॉक
युट्युबने या चॅनलवर बंदी घालण्याआधी फेसबुकची मूळ कंपनी 'मेटा'नेही (Meta) आरटी आणि स्पुतनिकवर बंदी घालणार असल्याची घोषणा केली होती. मेटाचे ग्लोबल अफेयर्सचे हेड निक क्लेग यांनी ट्विटरवर माहिती दिली होती की, युरोपियन देशांच्या विनंतीनुसार त्यांनी युरोपियन युनियनमधील रशियन मीडिया आउटलेटवर बंदी घालणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
ट्विटरने ही केली कारवाई
यूट्यूबने RT आणि Sputnik वर फक्त युरोपमध्ये बंदी घातली आहे. या बंदीनंतर यूट्यूबच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात असे सांगितले आहे की, आमचे स्टिस्टम पूर्णपणे रॅम्प-अप होण्यासाठी वेळ लागेल. आमची टीम या पूर्ण परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. यूट्यूब आणि फेसबुकशिवाय ट्विटरनेही रशियन मीडियावर कारवाई केली आहे. ट्विटरने म्हटले आहे की, त्यांनी रशियाच्या सरकारी माध्यमाच्या ट्विटची रेंज कमी केली आहे. दरम्यान, रशियाने गेल्या आठवड्यात फेसबुकवर अंशत: बंदी घातली होती. त्यानंतर रशियामध्ये फेसबुक प्लॅटफॉर्मचा वेग खूपच कमी झाला आहे. ट्विटरच्या बाबतीतही असेच घडले आहे. ट्विटरने याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, रशियात अनेक वापरकर्त्यांना ट्विटर लॉगइन करण्यास अडचणीचा सामना करावा लागत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेन प्रकरणावर 7 आणि 8 मार्चला आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार
- Russia-Ukraine War : किव्ह संकटात, उपग्रहानं टिपला 'पुरावा'; रशियाची अजस्त्र फौज मोठा हल्ला करण्याच्या तयारीत
- Joe Biden on Russia Ukraine: युक्रेनच्या जमिनीवर अमेरिकन सैन्य? बायडन यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- Petrol-Diesel Price : रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा उच्चांक, देशात दर काय?