Russia Ukraine War : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळं जगाची चिंता वाढली आहे. अशातच या युद्धासंदर्भात भारतानं घेतलेल्या भूमिकेमुळं अमेरिकेची चिंता वाढवली आहे. याचा परिणामही गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि अमेरिका प्रशासनातील अधिकारी भारतासोबतच्या मैत्रीबाबत जगासमोर उघडपणे वक्तव्य करत आहेत. 

Continues below advertisement

बायडन प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं खासदारांना सांगितलं की, चीन प्रत्येक गोष्टीत भारताला चिथवण्याचा प्रयत्न करत आहे. जसं तो संयुक्त राज्य अमेरिकेसोबत करत आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, "चीनच्या चिथावणीला तोंड देण्यासाठी भारताची संरक्षण क्षमता बळकट करण्यासाठी, प्रगतीचा वेग वाढवण्याचा वॉशिंग्टनचा निर्धार आहे. बीजिंगनं पूर्व लडाख सीमेवर लष्करी फौजा न आणण्याच्या कराराचं उल्लंघन केल्यानंतर भारताचे चीनसोबतचे संबंध सध्या अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहेत." 

जो बायडन प्रशासनातील सहाय्यक परराष्ट्र मंत्री डोनाल्ड लू म्हणाले की, "चीन ज्या प्रकारे अमेरिकेला वागवतो त्याच प्रकारे भारताला चिथावणी देत ​​आहे. चीनने भारतीय सीमेवर झालेल्या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या रेजिमेंटल कमांडरची निवड केल्यानंतर भारतानं बीजिंग ऑलिम्पिक खेळांवरही बहिष्कार टाकला." पुढे बोलताना ते म्हणाले की, "या संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. अलीकडेच चीनने नवा नकाशा जारी केला आहे. ते भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्याच्या मोठ्या भागावर दावा करत आहेत, जिथे त्यांनी आपल्या शहरांची नावं चिनी नावांसह ठेवली आहेत."

Continues below advertisement

भारतासोबत संरक्षण संबंध मजबूत करतंय अमेरिका 

भारताची संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी अमेरिका भारतासोबत काम करत असल्याचंही त्यांनी खासदारांना सांगितलं. ते म्हणाले की, "आम्ही आमच्या महत्त्वाच्या संरक्षण भागीदारीत प्रगतीचा वेग वाढवत आहोत. तसेच मजबूत नौदल सहकार्य, वाढीव माहिती आणि गुप्तचर आदान-प्रदान, तसेच अंतराळ आणि सायबरस्पेस यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवत आहोत. चीनची चिथावणी रोखण्यासोबतच आम्ही भारताची क्षमता बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहोत."

महत्त्वाच्या इतर बातम्या :