Nine Year Old Kid Runs Away From Home : गेल्या 3 वर्षात कोरोनामुळे (corona) शाळा बंद असल्याने शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्टडीचा पर्याय देण्यात आला. ज्याच्या माध्यमातून शिक्षक इंटरनेटच्या माध्यमातून शिकवणी घेत असे, त्यावेळी मुलांकडे मोबाईल किवा लॅपटॉपचा आधार होता, ज्यामुळे ही मुलं शिक्षण घेऊ शकत होते. मात्र त्या सोबतच आजकाल मुलांना नकळतपणे मोबाईल पाहण्याची सवय लागते. त्यावेळी इंटरनेटवर ही मुलं विविध व्हिडिओ, किवा माहिती सर्च करून पाहत असतात. याचाच एक परिणाम म्हणून एक अजबच प्रकार समोर आलाय. इंटरनेट सर्चिंगने माहिती मिळवत एक 9 वर्षांचा मुलगा चक्क घरातून पळून गेला आणि एवढ्यावरचं तो थांबला नाही, तर तब्बल 2700 किमीचा प्रवास त्याने एकट्याने केल्याचं समोर आलंय. 


इंटरनेट सर्चिंगने माहिती मिळवत 9 वर्षांचा मुलगा घरातून पळून गेला
सर्वांनाच माहित आहे की,  इंटरनेट हा ज्ञानाचा महासागर आहे, ज्याच्या माध्यमातून जगातील कोणतीही व्यक्ती नवीन गोष्टी शिकू शकतात. कधी कधी लहान मुलं इंटरनेटवरून माहिती मिळवून एकापेक्षा एक कारनामे  करतात. असाच एक प्रकर समोर आला आहे. तिकिटाविना विमानात प्रवास कसा करायचा? अशी माहिती इंटरनेटवर सर्च करत एक 9 वर्षांचा मुलगा घरातून पळून जाण्यात यशस्वी झाला आणि विमानात बसून 2700 किमीचा प्रवास केला. हा सर्व प्रकार त्याने इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून केले. 


ब्राझीलमधील प्रकार


ब्राझीलच्या मॅनौस शहरात राहणारा नऊ वर्षांचा इमॅन्युएल मार्क्स हा मुलगा आपल्या पालकांना न सांगता घरातून बेपत्ता झाला. जेव्हा इमॅन्युएलच्या आईला कळते की तिचा मुलगा घरातून बेपत्ता आहे. तेव्हा त्यांनी शनिवारी हरवल्याची पोलींसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केला, तेव्हा पोलिसांना इमॅन्युएल घरापासून चक्क 2700 किमी दूर सापडला, तेव्हा त्यांच्या पालकांना दिलासा मिळाला. पोलीसांनी इमॅन्युएल निरोगी आणि सुरक्षित असल्याची पालकांना माहिती दिली. ऑनलाईन स्टडीमुळे आजकालच्या मुलांना एकप्रकारे मोबाईलची सवय लागलीय, मग पुढे पुढे जस जसे ते मोठे होत जातात. ही सवय इतकी वाढते की त्या मुलांना मोबाईल व इंटरनेटशिवाय दुसरं काही सुचत नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha