China politics : युक्रेनच्या ( ukraine) मुद्द्यावरून अमेरिका (america) आणि रशियामध्ये (russia) तणाव सध्या वाढत आहे, या संदर्भात चीनचे (china) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (xi jinping)  यांनी रशियाचे (russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (vladimir putin) यांच्यासोबत बैठक पार पडली. या दरम्यान दोन्ही देशांनी अमेरिका (america) आणि मित्र राष्ट्रांविरुद्ध आघाडी मजबूत करण्याचा आग्रह धरला. युक्रेनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने (china) शुक्रवारी रशियाशी सहमती दर्शवत नाटोच्या (NATO) विस्ताराचा विरोध केला. त्याच वेळी, मॉस्कोने क्वाड (QUAD)वर आक्षेप घेतला, तर आशिया-पॅसिफिक प्रदेशात बीजिंगच्या (beijing) संघटनेच्या विरोधाचे समर्थन केले. बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकच्या (beijing olympic) उद्घाटन समारंभाच्या पार्श्‍वभूमीवर चीन आणि रशियामध्ये बैठक पार पडली. या दरम्यान दोघांमध्ये युक्रेनसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, तसेच यासंबंधी निवेदनही देण्यात आले. यावेळी दोन्ही देशांनी अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध आघाडी मजबूत करण्याचा आग्रह धरला.



चीननेही नाटोच्या विस्ताराला विरोध केला
युक्रेनच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि रशियामध्ये तणाव सध्या वाढत आहे, मात्र याच दरम्यान चीनने रशियाला पाठिंबा दिला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांच्या विरोधात पुन्हा नव्याने प्रयत्न करण्याचा आग्रह धरला आहे. त्याचवेळी नाटोच्या विस्तार योजनेला विरोध करताना चीनने रशियाशी हातमिळवणी केली आहे.


अमेरिकेचीही आक्रमक भूमिका


चीन आणि रशिया यांच्यातील वाढत्या मैत्रीबाबत अमेरिकेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. युक्रेनवरील आक्रमणानंतर चीन आणि रशिया यांच्यातील मैत्री महागात  पडेल, असे अमेरिकेचे मत आहे. युक्रेनवर हल्ला झाला तर त्याचा मित्र चीनही रशियाला वाचवू शकणार नाही. यामुळे रशियाची अर्थव्यवस्था आणखी नष्ट होईल.


..अन्यथा भयंकर परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा
युक्रेनवर रशियन आक्रमणाच्या परिणामांची भरपाई करण्यासाठी रशिया आणि चीनमधील घनिष्ठ संबंध तयार नसल्यामुळे रशियाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊ शकते, असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने रशियाला दिला. यानंतर अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी युक्रेनवर हल्ला झाल्यास भयंकर परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहण्याचा इशारा रशियाला दिला आहे.