वासुदेव गायतोंडे यांचं 50 कोटीचं चित्र चोरीला
एबीपी माझा वेब टीम | 07 Nov 2016 12:03 PM (IST)
मुंबई: प्रख्यात चित्रकार वासुदेव गायतोंडे यांचं सुमारे 50 कोटी किमतीचं जगविख्यात चित्र चोरी झाल्याची तक्रार मुंबईतल्या वरळी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. निर्लॉन हाऊस या कंपनीच्या कार्यालयात लागलेलं हे चित्र अमेरिकेच्या एका गॅलरीमध्ये पाहिल्याची तक्रार कंपनीचे संचालक जनक मथुरादास यांनी दिली आहे. 1960 साली तयार केलेलं हे चित्र हे निर्लॉन हाऊसची शान मानलं जायचं. पण आता निर्लॉन हाऊसमध्ये असलेलं चित्र हे बनावट असल्याची शंका त्यांना आली आहे. दरम्यान, वरळी पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. वासूदेव गायतोंडे यांची यापूर्वीची चित्रंही कोट्यवधी रुपयांना विकले गेले आहेत.