हॅरी हे आता ड्यूक ऑफ ससेक्स झाले आहेत, तर मेगन मार्कल या हर रॉयल हायनेस द डचेस ऑफ ससेक्स म्हणून ओळखल्या जातील. प्रिन्स हॅरी हे दिवंगत प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांचे धाकटे पुत्र, तर क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आहेत.
'चांगल्या आणि वाईट काळात, गरीबीत आणि श्रीमंतीत, आरोग्यात आणि अनारोग्यात, जोपर्यंत काळ मला तुझ्यापासून हिरावत नाही, तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन' असं म्हणत प्रिन्स हॅरी यांनी मेगनसोबत आजन्म लग्नबंधनात अडकण्याची शपथ घेतली.
मेगन मार्कलनेही या शपथेचा पुनरुच्चार करत वेडिंग रिंग्स एक्स्चेंज केल्या.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात टोरंटोमध्ये आयोजित एका स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये प्रिन्स हॅरी आणि मेगन हातात हात घालून पहिल्यांदा जाहीर मंचावर दिसले होते.
ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कलचा साखरपुडा
कॅलिफोर्नियात राहणारी 36 वर्षांची मेगन मार्कल टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री आहे. 'सुट्स' या लिगल ड्रामा शोमध्ये मेगनने साकारलेली भूमिका चाहत्यांचं मन जिंकून घेत आहे. फ्रिंज, सीएसआय : मायामी, नाईट रायडर अँड कॅसल सारख्या टीव्ही सीरिज, हॉरिबल बॉसेस सारख्या चित्रपटात ती झळकली आहे.
याशिवाय लैंगिक समानता आणि महिला सबलीकरणासाठी असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला विंगसाठी मेगनने काम केलं आहे. स्त्री शिक्षण आणि मासिक पाळीशी निगडीत समज-गैरसमज यासारख्या विषयांवर तिने 'टाइम' मासिकात लिहिलं आहे.