रिओ दी जनेरोः रिओ ऑलिम्पिकमध्ये पत्रकारांना घेऊन जात असलेल्या बसवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात 3 जण जखमी झाले आहेत. पत्रकार ऑलिम्पिकच्या वार्तांकनासाठी जात असताना बसच्या खिडकीवर अचानक गोळीबार करण्यात आला.


 

 

पत्रकारांच्या या बसमध्ये एकूण 12 जण होते. बसवर अचानक गोळीबार करण्यात आला. ज्यामध्ये बसच्या खिडकीत बसलेल्या पत्रकरांना काचा लागून जखम झाली आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

 

गोळीबार की दगडफेक?

 

दरम्यान बसवर गोळीबार करण्यात आला, की दगडफेक झाली हे अद्याप अस्पष्ट आहे, असं ऑलिम्पिक आयोजन समितीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. बसवर अचानक गोळीबार केल्याचा आवाज आला. त्यामुळे उपस्थित लोक कसलाही विलंब न करता जमिनीवर झोपले, असं एक ब्रिटिश पत्रकार आणि घटनेच्या साक्षीदाराने एपी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

 

 

गोळीबार झालेली बस बास्केटबॉल मैदानाकडून ऑलिम्पिकच्या मुख्य स्थळाकडे पत्रकारांना वार्तांकनासाठी घेऊन जात होती. यापूर्वीही ऑलिम्पिकच्या सुरुवातील सायकल ट्रॅकच्या बाजूला धमाका झाला होता.