जपानचे सम्राट अकिहितो पदमुक्त होणार?
एबीपी माझा वेब टीम | 09 Aug 2016 06:19 AM (IST)
मुंबई : जपानचे सम्राट अकिहितो यांनी पद सोडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी आपल्या ढासळत्या प्रकृतीमुळे लवकरच पद सोडणार असल्याचे संकेत आज दिलेल्या भाषणामध्ये दिले आहेत. "आपण आजपर्यंत जबाबदारीचे पालन केले आहे. पण आता वयोमानाप्रमाणे आणि प्रकृतीमुळे हे काम करणे कठीण होत आहे." असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे. पद सोडण्याचा विचार असल्याचे त्यांनी जरी सांगितलं नसलं तरीही 82 वर्षांच्या जपानसम्राटांनी आपल्या भाषणात असमर्थता व्यक्त केल्याने ते पद सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जपान सरकार या भाषणातील मुद्द्यांकडे गंभीरतेने पाहात असून सम्राटांवरील ताण कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी स्पष्ट केलं आहे.