सॅन फ्रान्सिस्को : टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीतील अग्रगण्य कंपनींपैकी एक मानल्या जाणाऱ्या 'इंटेल'मध्ये एक अनोखी गोष्ट पाहायला मिळत आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्यामुळे 'इंटेल'चे सीईओ ब्रायन क्रेझनिक यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
58 वर्षीय क्रेझनिक हे काही काळापूर्वी एका ज्युनिअरसोबत परस्पर संमतीने रिलेशनशीपमध्ये होते. मात्र या नातेसंबंधांमुळे कंपनीच्या मॅनेजर्ससाठी लागू असलेल्या धोरणांचं उल्लंघन झालं आहे, असं अंतर्गत आणि बाह्य समितीच्या चौकशीत उघड झालं.
क्रेझनिक यांचे कुठल्या कर्मचाऱ्याशी नातेसंबंध होते, या रिलेशनशीपचा कालावधी किंवी अन्य कोणताही तपशील उघड करण्यास कंपनीने नकार दिला आहे. चौकशी प्रक्रिया सुरु असल्याची माहिती इंटेलतर्फे देण्यात आली आहे.
क्रेझनिक यांनी 1982 मध्ये इंटेल' कंपनी जॉईन केली होती. मे 2013 पासून पाच वर्ष त्यांनी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची धुरा सांभाळली आहे. क्रेझनिक पायउतार झाल्यानंतर रॉबर्ट स्वॉन यांना अंतरिम सीईओपद देण्यात आलं आहे.