राजगौरी पवार या भारतीय वंशाच्या मुलीचा आयक्यू 162 एवढा नोंदवण्यात आला आहे. तिने ब्रिटिश मेन्सा आयक्यू टेस्टमध्ये सहभाग घेतला होता. 162 एवढा आयक्यू असणारी राजगौरी 18 वर्षांखालील एकमेव मुलगी आहे.
राजगौरीला या विक्रमानंतर ब्रिटिश मेन्सा मेंबरशीप देण्यात आली आहे. हाय आयक्यू असणाऱ्या व्यक्तींना ही मेंबरशीप देण्यात येते. माझ्या देशाचं प्रतिनिधित्व मला परदेशात करायला मिळत असल्याचा अभिमान असल्याचं राजगौरीने म्हटलं आहे.
कोण आहे राजगौरी पवार?
भारताचा झेंडा परदेशात फडकावणारी मराठमोळी राजगौरी पवार ही मूळची पुण्याची आहे. तिचे वडील डॉक्टर सूरजकुमार पवार मॅन्चेस्टर विद्यापीठात रिसर्च साइंटिस्ट आहेत. राजगौरीचं कुटुंब मूळ पुण्याचं आहे.
एवढा आयक्यू असणारे जगभरात केवळ 20 हजार जण आहेत, ज्यामध्ये केवळ 1500 मुलं आहेत. यामध्ये आता राजगौरीचाही समावेश झाला आहे.