इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि तहरिक-ए-इन्साफ या राजकीय पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी वयाच्या 65 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न केल्याची माहिती मिळते आहे. पाकिस्तानमधील वृत्तपत्राने यासंबंधी वृत्त प्रसारित केले आहे.
'द न्यूज' या पाकिस्तानी वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, इम्रान खान यांनी एक जानेवारी रोजी त्याची आध्यात्मिक मार्गदर्शक असलेल्या महिलेशी निकाह केला आहे.
इम्रानच्या तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे एक पदाधिकारी असलेल्या मुफ्ती सईद यांनी हा निकाह लावून दिल्याचं समजतं.
इम्रानने जेमिमा खानशी केलेला पहिला निकाह नऊ वर्षे टिकला. त्यानंतर रेहम खान नावाच्या टीव्ही पत्रकाराशी झालेला त्याचा निकाह जेमतेम दहा महिने टिकला. इम्रानने केलेल्या तिसऱ्या निकाहच्या बातमीला दुजोरा मिळू शकलेला नाही.