पाकिस्तानातील सिंध तालुक्यात कांगा गावात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 24 वर्षांची समिना सिंधू उर्फ समिना समून गाणं सादर करत होती.
तारीक अहमद जातोई नावाच्या व्यक्तीने समिनाला उभं राहून गाणं सादर करण्याची मागणी केली. मात्र गर्भवती असल्याने समिनाने त्याची मागणी धुडकावली.
थोड्या वेळाने काही जणांनी समिनावर पैसे उधळले आणि ती उभी राहून गाणं सादर करु लागली. आपली मागणी धुडकावल्याच्या रागातून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तारीकने समिनावर गोळी झाडली.
समिनाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं.
घडलेला प्रकार कॅमेरात कैद झाला असून हत्येच्या दोन दिवसांनी पाकिस्तानातील लार्कानो न्यूजने ही व्हिडिओ क्लीप दाखवली आहे.
पत्नी गर्भवती असल्याने समिनाच्या पतीने या प्रकरणी आरोपीवर दुहेरी हत्येची केस दाखल करण्याची मागणी केली आहे.
पाहा व्हिडिओ :