लंडन : भारतात एखाद्या व्यक्तीने एक लाख किंवा पाच लाखांची नंबर प्लेट खरेदी केली तर ती मोठी बाब समजली जाते. आपल्या कारची नंबर प्लेट स्पेशल आणि हटके असावी यासाठी लोक यापेक्षाही जास्त पैसे खर्च करण्यासाठी तयार असतात. पण परदेशात कारच्या व्हीआयपी नंबर प्लेटचा विषय आला तर ही रक्कम एवढी मोठी असते की, आपण त्याचा विचारही करु शकत नाही.
युनायटेड किंग्डममध्ये 'F1' हा नंबर अधिकृतरित्या विकण्यासाठी ठेवला असून त्याची किंमत 14 मिलियन पौंड म्हणजेच तब्बल 132 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही नंबर प्लेट जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट असल्याचं म्हटलं जात आहे.
'F1' हा नंबर आता स्टेटस बनला आहे. मर्सिडिज-मॅक्लेरेन एसएलआर, कस्टम रेन्ज रोव्हर आणि बुगाटी वेरॉन यांसारख्या कारवर ही नंबर प्लेट लावली जाते.
याआधी 2008 मध्ये चार कोटी रुपयांत ह्या नंबर प्लेटची विक्री झाली होती. तर 1904 पासून ह्या नंबर प्लेटचा हक्क अॅक्सेस सिटी काऊन्सिलकडे होता. सध्या F1 नंबरच्या या प्लेटचा हक्क अफझल खान यांच्याकडे आहे. अफझल खान हे कस्टमाईज्ड वाहनं बनवणारी 'खान डिझाईन' या कंपनीचे मालक आहेत.
'फॉर्म्युला वन'चा शॉर्टफॉम 'F1' होतो. युनायटेड किंग्डमपासून जगभरात असा नंबर असलेली ही प्लेट फारच लोकप्रिय आहे. ही नंबर प्लेट महाग असण्याचं कारण म्हणजे याची केवळ दोन अक्षरं. जर ह्या नंबर प्लेटची विक्री झाली तर ती जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट ठरेल.
आतापर्यंत हा विक्रम दुबईत विक्री झालेल्या 'D5' प्लेटच्या नावावर आहे. ह्या नंबर प्लेटची विक्री 67 कोटी रुपयांत झाली होती. महत्त्वाचं म्हणजे भारताचे बलविंद साहनी यांनी ही नंबर प्लेट खरेदी केली होती.
एवढं असूनही भारतात अजूनही कस्टमाईज्ड नंबर प्लेटची कोणतीही तरतूद नाही. तुम्ही थेट आरटीओमधून विशेष नंबरची कोणतीही प्लेट खरेदी करु शकता. दुचाकींसाठी पाच हजार रुपयांपासून 50 हजार रुपयांच्या रेंजमध्ये नंबर प्लेट उपलब्ध आहे. तर चारचाकींसाठी ही रेंज 15 हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत आहे. जर ग्राहक जास्तीत जास्त रक्कम देण्यासाठी तयार असेल, तर अशावेळी बोली लावली जाते.
जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट, किंमत तब्बल...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Apr 2018 05:21 PM (IST)
'F1' हा नंबर आता स्टेटस बनला आहे. मर्सिडिज-मॅक्लेरेन एसएलआर, कस्टम रेन्ज रोव्हर आणि बुगाटी वेरॉन यांसारख्या कारवर ही नंबर प्लेट लावली जाते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -