Volcanoes Found on Venus : अवकाशामध्ये अनेक रहस्य दडलेली असून जगभरातील शास्त्रज्ञांकडून याबाबत संशोधन सुरु आहे. नासाच्या वैज्ञानिकांनी आता आणखी एक रहस्य उलगडलं आहे. वैज्ञानिकांनी  सापडले आहेत. नासाच्या अंतराळ यानाने काढलेल्याशुक्र ग्रहावर ज्वालामुखींच्या सक्रिय असल्याचे पुरावे फोटोंमधून हे समोर आलं आहे. नुकतेच नासाच्या मॅगेलन अंतराळयानाने (Magellan Spacecraft) शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागाची वेगवेगळ्या कक्षेतून फोटो काढले आहेत. यामध्ये शुक्र ग्रहावर काही ठिकाणी ज्वालामुखींच्या हालचाली दिसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


वैज्ञानिकांनी अंतराळातील आणखी एक रहस्य उलगडलं


शास्त्रज्ञांना शुक्र ग्रहावर ज्वालामुखीच्या हालचालीची चिन्हे आढळली आहेत. नासाच्या शास्त्रज्ञांनी नवीन संशोधनानुसार शुक्रावर जागृत ज्वालामुखी असल्याचा अंदाज वर्तवला आहे. वैज्ञानिकांनी अंतराळ मोहिमांमध्ये काढलेल्या 30 वर्ष जुन्या फोटोंचा अभ्यास आणि निरीक्षण केलं. दरम्यान, गेल्या एका वर्षाच्या आत ज्वालामुखीच्या आकारात झपाट्याने बदल झाल्याचं नासाच्या शास्त्रज्ञांना आढळून आलं आहे. या नव्या शोधामुळे अंतराळातील आणखी एक रहस्य उलगडलं आहे. तसेच जगभरातील शुक्र ग्रहाच्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना नव्याने उत्साह आला आहे. 


शुक्र ग्रहावर ज्वालामुखींच्या सक्रिय असल्याचे पुरावे


शुक्र हा ग्रह पृथ्वीप्रमाणे आहे. यामुळेच शुक्र ग्रहाला सिस्टर प्लॅनेट म्हणजे पृथ्वीची बहिण असंही म्हटलं जातं. पृथ्वी आणि शुक्राचा आकार, वस्तुमान, घनता आणि आकारमान यामध्ये खूप समानता आढळते. यामुळेच शुक्र आणि पृथ्वी यांना अनेकदा जुळ्या बहिणी म्हटलं जातं. दरम्यान, सॅटेलाईट, अंतराळयान आणि रडार यांच्या दशकांपूर्वीपासून आता पर्यंतच्या फोटोंच्या अभ्यासातून या दोन्ही ग्रहांमध्ये आणखी एक समानता आढळली आहे. या दोन्ही ग्रहांवर सक्रिय ज्वालामुखी आहे.


ज्वालामुखीच्या तोंडाच्या आकारात बदल


सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या नवीन अभ्यासात शुक्र ग्रहावरील सक्रिय ज्वालामुखीचे पुरावे समोर आले आहेत. संशोधनात असे दिसून आले आहे की, शुक्र ग्रहावरील 2.2 चौरस किलोमीटरवर पसरलेल्या ज्वालामुखीच्या वेंटच्या आकारात आठ महिन्यांत बदल झाला आहे. यावरून हा ज्वालामुखी सक्रिय असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.


अनेक दशके जुन्या रडार फोटोंचं निरीक्षण आणि अभ्यासात शुक्रावरील सक्रिय ज्वालामुखीचे नवीन पुरावे मिळाले आहेत. शुक्रावरील ज्वालामुखीच्या वेंटच्या आकार गेल्या आठ महिन्यांत मोठा बदल झाला आहे. ज्वालामुखीचा वेंट म्हणजे ज्वालामुखीचं तोंड ज्यामधून लाव्हा बाहेर वाहतो.


ज्वालामुखीमधून लाव्हा बाहेर पडल्याचे पुरावे


रडार फोटोंच्या अभ्यासानुसार, ज्वालामुखीमधून लाव्हा बाहेर पडण्याची चिन्हे दिसून आली आहेत. फोटोंमध्ये ज्वालामुखीच्या तोंडाचा आकार दुप्पट झाला होता आणि लाव्हाही ज्वालामुखीच्या तोंडाच्या अगदी जवळ पोहोचला होता. शुक्रावरील माट मॉन्स या ज्वालामुखीमध्ये हा बदल आढळून आला आहे. माट मॉन्स हा शक्र ग्रहावरील दुसरा सर्वात उंच ज्वालामुखी आहे. शुक्राच्या विषुववृत्ताजवळील या ज्वालामुखीच्या आकारत झालेला बदल म्हणजे हा ज्वालामुखू सक्रिय असल्याची माहिती असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे.


सक्रिय ज्वालामुखीचा पृथ्वीवर काय परिणाम?


शुक्र ग्रहावर सापडलेल्या सक्रिय ज्वालामुखींचा पृथ्वीच्या वातावरणावर काय परिणाम होऊ शकतो. याचा शास्त्रज्ञांकडून अभ्यास सुरु आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


काय सांगता... मानवाचे कापलेले अवयव पुन्हा वाढवता येणार? शास्त्रज्ञांचं नवं संशोधन