North Korea Kim Jong Un : उत्तर कोरियाचा (North Korea) हुकुमशाह किम जोग उनच्या (Kim Jong Un) डोक्यात काय चाललं, असा प्रश्न आता जगाला पडला आहे. उत्तर कोरियाकडून पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (Ballistic Missile) चाचणी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाकडून लष्करी ताकद वाढवण्यावर भर दिला जात आहे. उत्तर कोरियाने रविवारी समुद्राच्या दिशेने एक लहान-पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र लाँच केले. उत्तर कोरिया शेजारील दक्षिण कोरियाने ही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
उत्तर कोरियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा मारा
दक्षिण कोरियाच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाच्या वायव्य भागातून रविवारी सकाळी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र लाँच करण्यात आलं आहे. उत्तर कोरियाने प्रक्षेपित केलेल्या क्षेपणास्त्र त्याच्या पूर्व किनारपट्टीवरील पाण्यात उतरण्यापूर्वी देशभरातून उड्डाण केलं. दक्षिण कोरियाच्या सैन्याने उत्तर कोरियावर अधिक पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे.
किम जोंग दक्षिण कोरिया-अमेरिका यांच्यासंबंधाच्या विरोधात
अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील वाढत्या जवळीकमुळे किम जोंग उन त्रस्त आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात संयुक्त लष्करी सराव सुरु आहे. या लष्करी कवायतींना प्रतिसाद म्हणून उत्तर कोरिया क्षेपणास्त्र करून धोक्याचा इशारा देण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जातं आहे. उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संबंधाच्या विरोधात आहे.
जपानकडूनही वृत्ताला दुजोरा
जपानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की, रविवारी सकाळी उत्तर कोरियानं एक संशयित क्षेपणास्त्राचा मारा केला. क्षेपणास्त्र जपानच्या क्षेत्रात आलेलं नाही. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैन्याने गेल्या सोमवारी त्यांच्या संयुक्त लष्करी कवायती सुरू केल्यापासून उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र डागण्यात येत आहेत. या आठवड्यात उत्तर कोरियाने तिसऱ्यांदा संशयित क्षेपणास्त्राचा मारा केला आहे.
किम जोंग उन अमेरिकेविरोधात युद्धाचं रणशिंग फुंकणार?
उत्तर कोरियाचा (North Korea) हुकुमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) कडून युद्धाची जोरदार तयारी सुरु असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील काही दिवसंपासून अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात तणाव वाढताना दिसत आहे. या तणावाचं मूळ कारण आहे, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील वाढती जवळीक. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील मैत्रीपूर्ण संबंध वाढत असताना किम जोंग उन याविरोधात आहे. त्यामुळे उत्तर कोरिया महासत्त अमेरिकेला इशारा देण्यासाठी मिसाईल टेस्ट करत असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, येत्या काळात उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन अमेरिकेविरोधात युद्धाचं रणशिंग फुंकणार काय, अशी चिंता जागतिक पातळीवर व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :