अमेरिकेचे थिंक टँक मानल्या जाणाऱ्यांशीही मोदी संवाद साधतील. भारतीय वेळेनुसार पहाटे दोन वाजताच्या सुमारास मोदी वॉशिंगटनला पोहचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचा हा चौथा दिवस आहे.
पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना
गेल्या दोन वर्षांत भारतातून चोरी झालेल्या सांस्कृतिक वारशांना पुन्हा मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं मोदींनी स्वित्झर्लंडमध्ये सांगितलं. भारतात काही पुरातन कलाकृती असून त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कलाकृती पाहून आपले पूर्वज विज्ञान आणि कलेच्या क्षेत्रात किती मातब्बर होते, याची जाणीव होत असल्याचं मोदींनी सांगितलं.
हा सर्व खजिना आम्हाला परत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मोदींनी बराक ओबामा यांचे आभार मानले. आम्हाला आमच्या भूतकाळाशी नाळ जोडण्यास मदत होईल, असं सांगतानाच सरकार अशा तस्करीविरोधात कठोर कायदा करण्याच्या तयारीत असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.
अफगाणिस्तानातील सलमा धरणाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन
भारताच्या मदतीने अफागाणिस्तानमध्ये बांधण्यात आलेल्या सलमा धरणाचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्तपणे बटन दाबून धरणाचं उद्घाटन केलं.
हे धरण बांधण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला 1700 कोटी रुपयांची मदत केली. अफगाणिस्तानच्या विकासात भारताने नेहमीच महत्त्वपूर्ण वाटा उचलला आहे. हे धरणही त्याचंच उदाहरण मानलं जातं.
यावेळी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदी यांना अफगाणिस्तानमधील सर्वोच्च पुरस्कार अमीर अमिनुल्ला खार पुरस्कारानेही गौरवले.
चौथा अमेरिका दौरा, तर दुसरा अफगाणिस्तान दौरा
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा चौथा अमेरिका दौरा आहे आणि दुसरा अफिगाणिस्तान दौरा आहे. याआधी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मोदी अफगाणिस्तानात गेले होते. अफगाणिस्तानातील संसद इमारतीचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं होतं.