मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट्सचा बेताज बादशाह अशी ज्याची ख्याती आहे, त्या फेसबुकच्या सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गचीच अकाऊण्ट सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. मार्कचं ट्विटर आणि पिंटरेस्ट अकाऊण्ट हॅक झाल्याची माहिती आहे.


 
2012 मध्ये लाखो यूझर्सचं लिंक्डइन अकाऊण्ट हॅक झालं होतं. वर्च्यू बीटच्या एका रिपोर्टनुसार यामध्ये मार्क झुकरबर्गचाही समावेश आहे. OurMineTeam नावाच्या हॅकरने याच लिंक्डइन अकाऊण्टच्या मदतीने मार्कचं ट्विटर, इन्स्टाग्राम आणि पिंटरेस्ट अकाऊण्ट हॅक केल्याचा दावा केला आहे.

 
संबंधित हॅकरच्या ग्रुपचे ट्विटरवर 40 हजारांहून जास्त फॉलोअर्स आहेत. या ग्रुपने मार्कच्या कथित ट्विटर अकाऊण्टवरुन ट्वीट्सही केले आहेत. 'मार्क, आम्ही सुरक्षा चाचणीसाठी तुझं ट्विटर, इन्स्टा आणि पिंटरेस्ट अकाऊण्ट हॅक केलं आहे. प्लीज आम्हाला उत्तर दे' असं त्यात म्हटलं आहे.

 

 



 
OurMineTeam च्या दाव्यानुसार झुकरबर्गच्या लिंक्डइनचा पासवर्ड dadada असा होता. मार्कच्या @finkd या ट्विटर अकाऊण्टवरुन 2012 पासून मात्र एकही ट्वीट दिसलेला नाही.