न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्युस्टनमध्ये दाखल झाले असून आज ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहे. त्यानंतर 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प हे देखील असणार आहेत.


अमेरिकेतील भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार स्वागत केलं. आज 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात मोदी भारतीयांसोबत अमेरिकन नागरिकांशीही संवाद साधतील. 50 हजारांहून अधिक भारतीय आणि अमेरिकन लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, अशी शक्यता आहे. ह्युस्टनमधील एनआरजी फुटबॉल स्टेडियममध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचंही या कार्यक्रमात भाषण होणार आहे. या कार्यक्रमात काही घोषणा करण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.





नरेंद्र मोदींनी आज भारत-अमेरिका उर्जा भागिदारीला प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिकन उर्जा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. अमेरिकेतील ऊर्जा क्षेत्रातील टेलुरियन कंपनीचा भारताच्या पेट्रोनेट कंपनीशी पाच टन एलएनजीचा करार झाला.


याशिवाय भारत संयुक्त राष्ट्र संघाच्या इमारतीवर सोलार पॅनल बसवण्याचं काम करणार आहे. दहा लाख डॉलरचा हा संपूर्ण प्रकल्प असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 सप्टेंबरला त्याचं उद्घाटन करणार आहेत.





ह्युस्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोहरा मुस्लीम समाजाच्या नागरिकांची भेट घेतली. यावेळी मोदींनी या नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला. बोहरा समाजाकडून पंतप्रधान मोदी यांचा शाल देऊन सन्मानही करण्यात आला. मोदींच्या अमेरिका दौऱ्यातून नेमकं काय साध्य होणार याकडे भारत, अमेरिकासह संपूर्ण जगाचं लक्ष याकडे आहे.