भारताच्या शेजारी दहशतवाद्यांचा गड, मोदींचा पाकिस्तानवर निशाणा
एबीपी माझा वेब टीम | 08 Jun 2016 03:05 PM (IST)
वॉशिंग्टन : अमेरिकन संसदेत भाषण करताना नरेंद्र मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन थेट अमेरिकेला सुनावलं आहे. तर आतंरराष्ट्रीय व्यासपीठावरुन पाकिस्तानलाही ठणकावलं. नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकन संसदेसमोर तब्बल पाऊण तास भाषण केलं. यामध्ये त्यांना दहशतवादाच्या मुद्द्यावर भर दिला.
दहशतवादामुळे भारत आणि अमेरिकेचं मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशातील नागरिक आणि सैनिकांना प्राण गमवावे लागलेत अशा स्थितीत दहशतवाद्यांचा बिमोड करणं आवश्यक आहे. अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानचा समाचार घेतला.
योग ही भारताना अमेरिकेला दिलेली देणगी आहे. आणि आजही 3 लाख अमेरिकन नागरिक योग करतात असं सांगायलाही मोदी विसरले नाहीत. भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:LIVE : सर्वांनी एकत्र येऊन दहशतवादाचा बिमोड करणं आवश्यक - मोदी LIVE : दहशतवादाला कोणताही धर्म नसतो - मोदी LIVE : दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांविरोधात कडक पावलं उचलण्याची वेळ आलीय - मोदी LIVE : दहशतवाद्यांचा किल्ला भारताच्या शेजारी आहे, नाव न घेता मोदींचा पाकिस्तानवर निशाणा LIVE : भारतात 100 स्मार्ट शहरं बनवणार - मोदी LIVE : भारतीय उपखंडात सर्व आव्हानांसाठी भारत सज्ज - मोदी LIVE : 2022 पर्यंत भारतातील प्रत्येक गावात इंटरनेट पोहोचवण्याचं उद्दिष्ट - मोदी LIVE : भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था - मोदी LIVE : 2022 पर्यंत भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम देश होईल - मोदी LIVE : भारताचा सर्वाधिक व्यापार अमेरिकेसोबत - मोदी LIVE : भारतीय योगाचा अमेरिकेवर प्रभाव - मोदी LIVE : विज्ञान-तंत्रज्ञानामुळेच भारतात रोजगार निर्मिती - मोदी LIVE : अमेरिकेने अडचणीच्या काळात भारताला वेळोवेळी मदत केली - मोदीLIVE : स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोमधील भाषणाचाही मोदींकडून उल्लेख LIVE : अमेरिकेप्रमाणे भारतातही व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व - मोदी LIVE : माझ्या सरकारसाठी संविधान हाच महान ग्रंथ - मोदी LIVE : विविधतेत एकता, हेच भारत आणि अमेरिकेचं समान सूत्र आहे - मोदी LIVE : मानवतेसाठी अमेरिका आणि भारतातील सैनिकांनी बलिदान दिलं - मोदी LIVE : अमेरिकेने लोकशाही देशांना बळकट बनवलं - मोदी LIVE : अमेरिकेतील काँग्रेसमध्ये भाषण करण्याचं निमंत्रण मिळालं, ही सन्मानाची गोष्ट- मोदी LIVE : अमेरिकेतील लोकशाही जगभरातील लोकशाहीला प्रेरणा देते - मोदी LIVE : थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट अमेरिकेच्या संसदेतून लाईव्ह LIVE : अमेरिकन संसदेत पंतप्रधान मोदीचं पहिलंच भाषण LIVE : अमेरिकेच्या संसदेत भाषण करणारे मोदी सहावे भारतीय पंतप्रधानLIVE : अमेरिकेच्या संसदेत भाषण करणारे मोदी सहावे भारतीय पंतप्रधानवॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातील आजचा दिवस खास असणार आहे. कारण आज पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या संसदेत भाषण करणार आहेत. वॉशिंग्टन डीसीच्या कॅपिटल हिलच्या इमारतीत पंतप्रधान मोदी संबोधणार असून, या भाषणावर जगभरातून लक्ष असणार आहे.