पाकिस्तानी चहावाल्याची शाहरुखलाही भुरळ
एबीपी माझा वेब टीम | 11 Nov 2016 11:30 AM (IST)
मुंबई : पाकिस्तानमध्ये सध्या एक चहावाला सर्वाधिक चर्चेत आहे. हा चहावाला त्याच्या निळ्या डोळ्यांमुळे सर्वांचं, विशेषत: तरुणींचं लक्ष वेधून घेत आहे. याच्या निळ्या नजरेने पाकिस्तानातीलच नव्हे तर भारतातील मुलीही अक्षरश: घायाळ झाल्या आहेत. आता बॉलिवूडचा किंग खान शाहरुखलाही याची भुरळ पडली आहे. अर्शद खान असं या तरुणाचं नाव आहे. अर्शद शाहरुखचा जबरा फॅन आहे. ही गोष्ट शाहरुखला समजल्यावर त्यानेही अर्शदच्या डोळ्यांचं कौतुक केलं आहे. https://twitter.com/iamsrk/status/796951958095433728 अर्शद देखील त्याच्या सौंदर्यामुळे आता एक स्टार झाला आहे. अनेक तरुणी अर्शदच्या डोळ्यांवर फिदा आहेत. जिया अलीच्या अकाऊंटवरुन सर्वात आधी या चहावाल्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यानंतर या फोटोला लाईक आणि शेअरचा अक्षरश: महापूर आला. या निली आखोंवाल्या अर्शदला सोशल मिडियावर न्यूक्लिअर वेपन आणि सर्जिकल स्ट्राईक ऑन इंडियन गर्ल्स म्हणूनही संबोधलं जातंय.