PM Modi Papua New Guinea Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी रविवारी (21 मे) पापुआ न्यू गिनीमध्ये पोहोचले. FIPIC परिषदेत सहभागी होण्यासाठी पीएम मोदी पापुआ न्यू गिनीमध्ये दाखल होताच त्यांचे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे (James Marape) यांनी स्वागत केले. यादरम्यान पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरणस्पर्श करून स्वागत केले. 


पापुआ न्यू गिनी येथील मोरेस्बी (जॅक्सन) आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान मोदींचे पारंपारिक पद्धतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय उपस्थित होते. पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 22 मे रोजी पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांसोबत भारत-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्यासाठी तिसऱ्या फोरम (FIPIC) शिखर परिषदेत सहभागी होतील. FIPIC ची स्थापना 2014 मध्ये पंतप्रधान मोदींच्या फिजी दौऱ्या दरम्यान झाली होती. 






 


मोदी जपानहून पापुआ न्यू गिनीत 


तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात मोदी पापुआ न्यू गिनीत पोहोचले आहेत. आजवरच्या कोणत्याही भारतीय पंतप्रधानांची पापुआ न्यू गिनीला ही पहिलीच द्विपक्षीय संबंधांमधील भेट आहे. पंतप्रधानांचे जपानहून येथे आगमन झाले. जपानमध्ये पीएम मोदी यांनी G-7 शिखर परिषदेत भाग घेतला. यावेळी त्यांनी अनेक जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. 


FIPIC मध्ये 14 देशांचा सहभाग 


दरम्यान, FIPIC परिषदेत 14 देशांचे नेते सहभागी होणार आहेत. कनेक्टिव्हिटी आणि इतर समस्यांमुळे हे सर्व क्वचितच एकत्र दिसून येतात. यामध्ये कूक आयलंड, फिजी, किरिबाटी, मार्शल बेटे, मायक्रोनेशिया, नाउरू, नियू, पलाऊ, पापुआ न्यू गिनी, सामोआ, सोलोमन बेटे, टोंगा, तुवालू आणि वानुआतु यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी मरापे यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल बॉब डेड यांचीही भेट घेतील.


इतर महत्वाच्य बातम्या