इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची येत्या मंगळवारी ओपन हार्ट सर्जरी होणार आहे. या शस्त्रक्रियेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी ट्वीट करुन शरीफ यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
https://twitter.com/narendramodi/status/736372814060486656
लंडनमध्ये शरीफ यांच्यावर शस्त्रक्रिया : संरक्षणमंत्री
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ सध्या वैद्यकीय तपासणीसाठी लंडनमध्ये असून मंगळवारी त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी करण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती देताना पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, ''डॉक्टरांनी पंतप्रधान शरीफ यांना ओपन हार्ट सर्जरीचा सल्ला दिला आहे. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना एक आठवडा रुग्णालयातच राहावं लागेल. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्लानुसार शरीफ यांच्या परदेश दौऱ्याची आखणी करण्यात येईल.''
मुलगी मरियम शरीफ यांचाही वृत्ताला दुजोरा
दरम्यान, नवाज शरीफ यांची मुलगी मरियम यांनीही शरीफ यांच्या शस्त्रक्रियेच्या बातमीला दुजोरा देणारं ट्वीट केलं आहे. स्कॅन आणि टेस्ट केल्यानंतर डॉक्टरांनी मंगळवारी ओपन हार्ट सर्जरीचा सल्ला दिला आहे. एक आठवडा त्यांना रुग्णालयातच राहावं लागेल. त्यानंतर ते लवकरच बरे होऊन पाकिस्तानमध्ये परत येतील.
https://twitter.com/MaryamNSharif/status/736247940251934721
https://twitter.com/MaryamNSharif/status/736248389407412225