मुंबई : चीनमधील वॉशिंग पावडरची एक जाहिरात वादग्रस्त ठरली आहे. या जाहिरातीमध्ये वर्णद्वेष दाखवल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या जाहिरातीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.


 

जाहिरातीमध्ये एक कृष्णवर्णीय तरुण दाखवला आहे. जाहिरातीमधील मॉडेल कृष्णवर्षीय तरुणाच्या तोंडात संबंधित कंपनीची वॉशिंग पावडर टाकते. काही क्षणात तो तरुण गोरा-गोमटा होतो, असं या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलं आहे.

 

मात्र ही जाहिरात म्हणजे वर्णद्वेषाला चालना देणारी असल्याचा आरोप होत आहे. ही जाहिरात जगभरात पसरली आहे.

 

या जाहिरातीचा व्हिडीओ अमेरिकन संगीतकार ख्रिस्तोफर पॉवेलने शेअर केला आहे. पॉवेलने हा व्हिडीओ पाहून चकीत झाल्याचं म्हटलं आहे.

https://www.youtube.com/watch?time_continue=41&v=9pv2t0UFyUM