लॉस एंजल्स: जगप्रसिद्ध मॅग्झिन ‘प्लेबॉय’चे संस्थापक ह्यू हेफनर यांचं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. ह्यू हेफनर यांचं वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याचं मॅग्झिनने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.


जगभरात सर्वाधिक विकलं जाणारं मॅग्झिन म्हणून ‘प्लेबॉय’ची ख्याती होती. 20 शतकात लैंगिक क्रांती घडवणारं मॅग्झिन म्हणूनही प्लेबॉय नावारुपास आलं.

'प्लेबॉय' हे जगभरातल्या तरुण वयातील मुलांमध्ये प्रचंड आकर्षण असलेलं मासिक. नग्न, अर्धनग्न तरुणींचे बोल्ड फोटो पाहण्यासाठी 'प्लेबॉय'चा अंक हातोहात विकले जात असत. अमेरिकेपासून ते जगभरातील कानाकोपऱ्यात ‘प्लेबॉय’ पोहोचलं होतं.

1 ऑक्टोबर 1953 रोजी 'प्लेबॉय'चा पहिला अंक प्रकाशित झाला होता. 1970 सालापर्यंत 'प्लेबॉय' मासिकाचा खप तब्बल 56 लाखाच्या घरात पोहोचला होता. मात्र इंटरनेटचा वापर वाढला आणि ‘प्लेबॉय’ बदद्लची उत्सुकता कमी कमी होत गेली.

त्यानंतर ‘प्लेबॉय’ने महिलांचे नग्न फोटो छापणार नसल्याचं घोषित केलं होतं. यापुढे नग्न नाही तर मादक फोटो छापू, असं त्यांनी दोन वर्षापूर्वी म्हटलं होतं.

हेफनर यांनी 1600 डॉलर पासून मॅग्झिनची सुरुवात केली होती, ज्यामधील 1000 डॉलर हे त्यांनी आईपासून उसने घेतले होते. या मॅग्झिनच्या सुरुवातीच्या काळात प्रसिद्ध अभिनेत्री मर्लिन मुनरोचा न्यूड फोटो छापला होता, त्यामुळे अमिरेकत खळबळ उडाली होती. तेव्हापासूनच जगभरात ‘प्लेबॉय’ मासिक प्रसिद्ध झालं होतं.

 

संबंधित बातम्या

म्हणून 'प्लेबॉय' मॅगझिनमध्ये नग्न फोटो नसणार