पीआयएच्या एका अधिकाऱ्याच्या नावे दिलेल्या वृत्तानुसार, एटीआरचे एक विमान उड्डाण करत होते, पण त्यापूर्वी एका अधिकाऱ्याने बकऱ्याचा बळी दिला. पण हा निर्णय विमानतळ प्राधिकरणाचा नसल्याचेही त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय.
वास्तविक, 7 सप्टेंबर रोजी एका विमान अपघातात 47 जणांचा मृत्यू झाल्यानंतर गेल्याच आठवड्यापासून पीआयएने आपल्या सर्व 9 एटीआर विमानचे उड्डाण तत्काळ थांबले. पण रविवारी कमी उंचीवरुन जाणाऱ्या ट्विन इंजिन टर्बोप्रोपच्या विमानाच्या उड्डाणापूर्वी धावपट्टीवर बकऱ्याचा बळी दिला असल्याचे पीआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
पण दुसरीकडे पीआयए अधिकाऱ्यांच्या या प्रकारानंतर पीआयएवर चोहोबाजूने टीकेची झोड उठवली जात आहे. विमानातील तांत्रिक बिघाडावर मार्ग काढण्याऐवजी बकऱ्याचा बळी देण्याचा मार्ग अधिकाऱ्यांनी योग्य मानल्याने पाकिस्तानी मीडियाने पीआयएला चांगलेच धारेवर धरले आहे.
पाकिस्तानमधील तेहरीक-ए-इंसाफ पक्षाचे नेते इमरान खान यांनेही टीका केली आहे. पीआयए जगातील सर्वात मोठी विमान कंपनी असूनही विमानाच्या यशस्वी उड्डाणासाठी बकऱ्याचा बळी देत असल्याबद्दल अश्चर्य व्यक्त केलं आहे.
तर दुसरीकडे पाकिस्तानच्या संरक्षण विभागाने यावर हद्दच केली आहे. कारण संरक्षण विभागने आपल्या ट्वीटमध्ये संपूर्ण जगाने विमान सुरक्षेच्या सुधारणांबद्दल पीआयएकडून शिकले पाहिजे. असं म्हणलं आहे.