न्यूयॉर्क : प्यूएर्तो रिकोच्या स्टेफनी डेल वेलाने 2016 चा विश्वसुंदरीचा क्राऊन पटकावला आहे.  डोमिनिकन रिपब्लिक आणि इंडोनेशियाच्या सौंदर्यवतींना मागे टाकत स्टेफनी डेले वेनाला मिसवर्ल्ड 2016 चा मान मिळाला.

19 वर्षीय स्टेफनी डेल वेनेला स्पॅनिश, इंग्लिश आणि फ्रेच भाषा अवगत आहेत. त्यामुळे एन्टरटेन्मेंट विश्वात करिअर करण्याची तिची इच्छा आहे.

2015 ची मिसवर्ल्ड स्पेनची मिरिया लालागुनाने स्टेफनीला मुकुट परिधान केला. कॅरेबियन देशाचं प्रतिनिधित्त्व करणं ही सन्मानाची आणि मोठी जबाबदारी आहे, असं स्टेफनी म्हणाली.



मिस डॉमिनिकन रिपब्लिक यारिट्झा मिगुएलिना रेयेस रमिरेज फर्स्ट रनरअप ठरली तर मिस इंडोनेशिया नताशा मॅनुएला सेकंड रनरअप होती. केनिया आणि फिलिपाईन्सच्या सौंदर्यवतींनीही पहिल्या पाचमध्ये जागा मिळवली.

तर भारताची प्रियदर्शनी चॅटर्जी ब्युटी कॅटेगरीच्या टॉप फाईव्हमध्ये पोहोचली. पण मुख्य स्पर्धेत तिला जागा मिळवता आली नाही. फेमिना मिस इंडिया 2016 ची विजेती प्रियदर्शनी मूळची गुवाहाटीची असून ती सायकॉलॉजीची विद्यार्थिनी आहे.