बँकॉकमध्ये आयोजित या स्पर्धेत जगभरातील 93 स्पर्धकांनी भाग घेतला होता. शेवटच्या टॉप टेन स्पर्धकांमध्ये काट्रियोनासहीत दक्षिण आफ्रिका, व्हिएतनाम, व्हेनेझुएला, कोस्टा रिका, कुराकाओ, नेपाळ, कॅनडा, थायलंड आणि पुअर्तो रिकोच्या स्पर्धकांचा समावेश होता. मात्र या सर्वांवर मात देत काट्रियोनाने हा किताब पटकावला.
काट्रियोना फिलिपिनो-ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजनवर सूत्रसंचालक, गायिका म्हणून प्रसिद्ध आहे. या आधी फिलिपाइन्सने 1969, 1973 आणि 2015 मध्ये विश्वसुंदरीचा किताब पटकावला आहे.
मिस युनिव्हर्स 2015 स्पर्धेत फिलिपाईन्सची पिया वर्जकैक मिस युनिव्हर्स बनली होती. या स्पर्धेत सूत्रसंचालकाच्या चुकीमुळे आधी मिस कोलंबियाच्या अरियादना ग्वातरेज नावाची घोषणा केली होती. तिला मिस युनिव्हर्सचा किताब देण्यातही आला. मात्र, सूत्रसंचालकाला चूक लक्षात आली आणि मिस कोलंबियाच्या शिरपेचातून ताज काढून फिलिपाईन्सच्या पिया वर्जकैक हिला देण्यात आला होता. यामुळे ही स्पर्धा चांगलीच चर्चीली गेली होती.