Pfizer Vaccine Effect on Omicron : ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे (Omicron Variant) जगभराची चिंता वाढली आहे. ओमायक्रॉनवरील (Omicron) लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन आणि अभ्यास सुरु आहे. फायझर (Pfizer) ची कोरोना लस डोस घेतलेल्या व्यक्तींसाठी चिंताजनक बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संशोधकांनी केलेल्या प्राथमिक अभ्यासात असे आढळून आले आहे की. कोरोना विषाणू (कोविड-19) विरुद्ध फायझरची लस कोरोनाच्या इतर व्हेरियंटपेक्षा ओमायक्रॉन व्हेरियंटविरूद्ध कमी अँटीबॉडीज म्हणजेच प्रतिकारशक्ती तयार करते. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे. तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी ओमायक्रॉन व्हेरियंटबाबत या आधीच संशोधन आणि अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉन व्हेरियंटसाठी नवीन लसीची आवश्यकता नाही. तथापि, काही अहवालात असे समोर आले की, ओमायक्रॉनवर नवीन लस आवश्यक असल्यास, ती तयार करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही कारण लस कंपन्यांकडे आधीच कोरोनाची मूळ लस आहे.
आफ्रिका हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटचा प्रयोग
डरबनमधील आफ्रिका हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगांमध्ये असे आढळून आले आहे की, दोन वर्षांपूर्वी चीनमध्ये आढळलेल्या कोरोना प्रकाराच्या तुलनेत ज्यांनी Pfizer-BioNtech च्या लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. मात्र ओमायक्रॉन विरोधात 40 टक्क्यांनी कमी प्रतिक्रारक्षमता म्हणजेच अँटीबॉडीज तयार होतात. म्हणजेच, फायझर लस ओमायक्रॉनवर केवळ अंशतः परिणामी आहे.
संशोधन प्रमुख अॅलेक्स सिगल यांचे विधान
प्रयोगशाळेतील संशोधन प्रमुख अॅलेक्स सिगेल यांनी सांगितले की, ''रोगप्रतिकारक शक्तीचे नुकसान लक्षणीय आहे. परंतु रोगावर लसीचा प्रभाव आणि परिणाम यांची अचूकता योग्यरित्या समजून घेण्यासाठी अधिक सखोल अभ्यास आवश्यक आहे.''
ओमायक्रॉन 40 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला
गेल्या महिन्यात प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमायक्रॉन व्हेरियंट आता प्रकार आता जगातील 40 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होतं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- CDS Bipin Rawat Death : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार, आज दिल्लीत दाखल होणार पार्थिव
- Bipin Rawat Death : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानं शोक; कोण असतील देशाचे पुढचे सीडीएस?
- शाळा, महाविद्यालयांना मान्यता देण्यापूर्वी डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या शिफारशी लागू करा; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha