वॉशिग्टंन : रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या वादात आता अमेरिकेनंही उडी घेतली आहे. युक्रेनच्या सीमेवर हल्ला झाल्यास सैन्य तैनात करणार असल्याचा इशारा अमेरिकेनं दिलाय. शीतयुद्धानंतर पहिल्यांदाच अमेरिकेनं नाटोच्या नव्हे तर स्वतःच्या नेतृत्वाखाली सैन्य तैनात करण्याची घोषणा केली आहे. युक्रेन सीमेवरील रशियाच्या सैन्य तैनातीमुळे युरोपात वातावरण तापायला सुरुवात झाली.
ऑक्टोबरमध्ये बेलारूस आणि पोलंड याच्यातील वादानंतर बेलारूसला मदत करण्याच्या बहाण्यानं रशियानं त्या ठिकाणी सैन्य तैनात केलं होतं. सध्या युक्रेन सीमेवर रशियाचं दीड लाख सैन्य आणि 12 हजार रनगाडे तैनात आहेत. त्यामुळे युरोपातलं वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी पुतीन आणि बायडेन यांच्यात चर्चेची शक्यताही वर्तवली जात आहे. अमेरिकेनं नुकतीच अफगाणिस्तानमधून संपूर्ण सैन्य माघार घेतली होती. पण आता युक्रेन सीमेवर अमेरिका सैन्य तैनात करण्याच्या तयारीत आहे.
रशियाचे दीड लाख सैन्य तैनात
रशियाने युक्रेनच्या सीमेवर सध्या दीड लाख सैन्य तैनात केले आहेत. रशियाने युक्रेनच्या सीमेवर 50 हजार बटालियन राखीव ठेवल्या आहेत. 12 हजार रणगाडे तयार ठेवले आहेत. या भागात अलिकडेच रशियाने 75 हजार सैनिकांच्या उपस्थितीत एक युद्धसराव पार पाडला आहे.
अमेरिकेने यावर आता आपली भूमिका अधिक कठोर केली असून रशियावर लष्करी कारवाईसोबतच आर्थिक निर्बंध लादण्याची तयारी सुरु केली आहे. रशियन सरकारच्या बाँड खरेदीस मनाई केली जाईल. रशियाकडून उत्तर युरोपात जाणारी गॅस पाइपलाइन, ग्लोबल इलेक्ट्रॉनिक सिस्टिमद्वारे बेदखल करण्याच्याही तरतुदी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :