इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ सध्या दुबईत आहेत. आपल्यावर उपचार करण्याचं कारण देत मुशर्रफ दुबईत गेले आहेत. मात्र, त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर मुशर्रफ यांच्यावर उपचार सुरु आहेत, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.
मुशर्रफ यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकार हमीद मीर यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुशर्रफ पत्नीसोबत डान्स करताना दिसत आहेत.
दरम्यान, लाल मस्जिद मर्डर केसमध्ये इस्लामाबाद सेशन कोर्टाने शुक्रवारी मुशर्रफ यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा हा व्हिडीओ समोर आल्याने मुशर्रफ यांच्यावर नक्की उपचार सुरु आहेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मार्चमध्ये पाकिस्तान सोडलं!
परवेझ मुशर्रफ यांनी मार्चमध्ये पाकिस्तानहून दुबईमध्ये गेले होते. त्यावेळी पाकिस्तान सरकारच्या भूमिकवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र, मुशर्रफ यांना उपचारासाठीच दुबईत जाण्याची परवानगी दिल्याचं मंत्री चौधरी निसार खान यांनी स्पष्ट केलं. त्यावेळी निसार खान यांनी सांगितलं होतं की, मुशर्रफ हे सहा आठवड्यांच्या आत पाकिस्तानात परततील.
पाहा व्हिडीओ :
https://twitter.com/HamidMirGEO/status/780069709161062400