Pervez Musharraf Health Updates : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती खालावली आहे. परवेझ मुशर्रफ गेल्या काही दिवासांपासून आजारी  आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दुबईतील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, आज त्यांची प्रकृती जास्त खालावली असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

  






गेल्या अकेन दिवसांपासून परवेझ मुशर्रफ आजारी आहेत. परंतु, शुक्रवारी अचनानत त्यांची प्रकृती जास्तच खालावली आहे. परवेझ मुशर्रफ यांना हृदयविकार आणि इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  मुशर्रफ गेल्या अनेक दिवसांपासून आजाराशी झुंज देत आहेत. 


मुशर्रफ यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहिती दिली आहे. "मुशर्रफ यांच्या आजाराच्या  (organs) गुंतागुंतीमुळे त्यांना गेल्या तीन आठवड्यांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता नसून त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा.'' असे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.   


मुशर्रफ यांचे निकटवर्तीय आणि माजी माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले की, मुशर्रफ संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथील रुग्णालयात दाखल आहेत.चौधरी म्हणाले की,  त्यांनी मुशर्रफ यांच्या मुलाशी चर्चा केली असून त्यांनी  मुशर्रफ आजारी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे." इम्रान खान सरकारमध्ये माहिती मंत्री असलेले फवाद चौधरी एकेकाळी मुशर्रफ यांचे प्रवक्ते होते.  


जनरल परवेझ मुशर्रफ यांनी ऑक्टोबर 1999 मध्ये लष्करी बंड करून पाकिस्तानची सत्ता काबीज केली होती. मुशर्रफ 2001 ते 2008 पर्यंत पाकिस्तानचे राष्ट्रपती होते.