मुंबई : 70 वर्षांपेक्षा जास्त जगणाऱ्या माणसांच्या मुलांना कर्करोग आणि हृदयरोगाचा धोका कमी असतो, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. अशा व्यक्तींचं आयुर्मानही जास्त असतं.


 

'जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कॉर्डिओलॉजी'मध्ये हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. या शोधनिबंधात ज्या पालकांचं वय 70 वर्षांपेक्षा जास्त असतं, त्यांच्या मुलांना हृदयरोग आणि कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. तसंच त्यांचं आयुर्मान 16 टक्क्यांनी वाढतं, असंही सांगण्यात आलं आहे.

 

या अभ्यासादरम्यान 1,86,000 मध्यमवयीन लोकांची माहिती गोळा करुन त्यावर 8 वर्षांपर्यंत लक्ष ठेवण्यात आलं. ज्या पालकांनी सत्तरी ओलांडली आहे त्यांच्या मुलांमध्ये हृदयरोग, उच्च रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल या आजारांचे प्रमाण कमी आढळलं. तसचं रक्तदाबाने किंवा कर्करोगामुळे मृत्यूचा धोकाही कमी असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं आहे.