मुंबई : कॅमेरुनचा फुटबॉलपटू पॅट्रिक एकेन्गचा अचानक मृत्यू झाल्यानं फुटबॉलविश्वावर शोककळा पसरली आहे. फुटबॉलच्या मैदानावरच हृदयविकाराच्या झटक्यानं एकेन्गची प्राणज्योत मालवली.

 
26 वर्षीय पॅट्रिक एकेन्ग रोमानियाच्या डायनामो बुकारेस्ट क्लबचं प्रतिनिधित्व करायचा. शुक्रवारी डायनामो आणि व्हिटोरुल कॉन्सटन्टा संघांमधल्या सामन्याच्या उत्तरार्धात पॅट्रिक 63 व्या मिनिटाला मैदानात उतरला. पण सातच मिनिटांनी तो मैदानातच कोसळला.

 
पॅट्रिकला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दीड तासाने डॉक्टरांनी पॅट्रिकला मृत घोषित केलं. पॅट्रिकचा मृत्यूने रोमानिया आणि कॅमेरुनसह जगभरातल्या फुटबॉल चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.