इस्लामाबाद : भारत-पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर पाक वृत्तपत्रांनीच नवाज शरीफ सरकार विरुद्ध आवाज उठवला आहे. पाकिस्तानी लष्कराचं लष्कर-ए-तय्यबा, तालिबान आणि हक्कानी या दहशतवादी संघटनांना असलेलं अभय आणि पाठिंबा यावर पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनी राळ उठवली आहे.


पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अझहर आणि मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद यांच्यावर कारवाई केल्यास देशाला नक्की कसला धोका आहे, असा प्रश्न देखील 'द नेशन्स' या पाकिस्तानी वृत्तपत्राने उपस्थित केला आहे.

याआधी 'डॉन' या वृत्तपत्राचे पत्रकार सायरिल अलमीडा यांनी पाक लष्कर आणि दहशतवादी संघटनांचे संबंध यावर लोकप्रतिनिधींचा झालेला वाद यावर लेख लिहिला होता. मात्र त्या लेखानंतर पाकिस्तान सरकारने त्यांच्यावर देशाबाहेर जाण्यास निर्बंध घातला. त्यावर 'द नेशन्स' या वृत्तपत्राने आवाज उठवला.

पाक सरकार दहशतवाद्यांवर कारवाई करण्याऐवजी वृत्तपत्रांची गळचेपी करत आहे. यामुळे पाक वृत्तपत्रांनी पाक सरकारला धारेवर धरलं आहे.