Pakistan : 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार साजिद मीर याला पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. यापूर्वी, एफबीआयने मोस्ट वाँटेड घोषित केलेल्या साजिदच्या मृत्यूचा दावा पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने (ISI) केला होता. तज्ज्ञांच्या मते, FATF च्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने मीरला शिक्षा करण्याचे नाटक केले आहे.


मीर पाकिस्तानमध्ये जिवंत


निक्की एशियाच्या अहवालानुसार, एफबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मीर पाकिस्तानमध्ये जिवंत आहे, कोठडीत आहे आणि त्याला शिक्षा झाली आहे. 2011 मध्ये, मीरला एफबीआयने त्याच्यावर $ 5 दशलक्ष बक्षीस देऊन मोस्ट वॉन्टेड यादीत समाविष्ट केले होते. अमेरिका आणि भारत हे दोघेही दशकभरापासून त्याचा शोध घेत आहेत. लष्कराचा म्होरक्या हाफिज सईदचा जवळचा साजिद हा मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली आणि इतर दहशतवाद्यांचा हस्तक असल्याचे मानले जाते.


FATF ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी खटाटोप
साजिद मीरच्या अटकेने पाकिस्तानला दाखवायचे आहे की, तो दहशतवादाविरोधात काम करतोय. या अटकेला FATF च्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याची योजना म्हटले जात आहे. जून 2018 पासून पाकिस्तानचा FATF च्या ग्रे लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. यावेळी जर्मनीमध्ये झालेल्या बैठकीत FATF ने ग्राउंड टेस्ट करून पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते. अशा परिस्थितीत पाकिस्तान दहशतवादाविरोधात उघडपणे काम करत असल्याचे दाखवू इच्छित आहे.


अमेरिकेने 50 लाखांचे बक्षीस जाहीर केले
दहशतवादी साजिद मीर हा लष्कर-ए-तैयबासाठी काम करायचा. मीर 2001 पासून सक्रिय असल्याची माहिती अमेरिकन तपास संस्था एफबीआयने दिली आहे. त्याने लष्कराच्या सहकार्याने अनेक दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली होती. अमेरिकेने त्याच्यावर 50 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या