नवी दिल्ली: काश्मीरप्रश्नी चर्चा करण्यासाठी पाकिस्ताननं भारताला निमंत्रण पाठवलं आहे. काश्मीर मुद्यावर तोडगा काढणं दोन्ही देशांचं कर्तव्य आहे असं पाकिस्ताननं म्हटलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त गौतम बांबावले यांना बोलावून चर्चेचं निमंत्रण पत्र दिलं आहे.

 

गेल्या काही दिवसांपासूनच पाकिस्तानने काश्मीरप्रश्नी नाक खुपसायला सुरूवात केली होती. याच महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या सार्क परिषदेत देखील राजनाथ सिंह यांनी काश्मीरमध्ये पाकिस्तानचा वाढत चाललेल्या हस्तक्षेपाचा मुद्दा उचलला होता.

 

दरम्यान, पाकिस्तानच्या या कुरापतखोरीमुळे दोन्ही देशात तणाव आणखी वाढू शकतो. भारताला पाकिस्तानबरोबर फक्त पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा करण्याची इच्छा आहे. जम्मू-काश्मीरवर चर्चेचा प्रश्नच येत नाही असं याआधीच भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.