mran Khan Audio Clip Viral : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या अडचणी वाढतच आहेत. इम्रान खान आता एका नव्या वादात अडकले आहे. त्यांची ऑडिओ क्लिप (Audio Clip Viral) सध्या व्हायरल होत असून ती एका अश्लील फोन कॉल रेकॉर्डिंगशी संबंधित आहे. इम्रान खान यांचे एका महिलेसोबतचे फोन कॉल रेकॉर्डिंग लीक झाले आहे. जे सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच व्हायरल होत आहे. व्हायरल क्लिपमध्ये इम्रान खान एका महिलेसोबत अश्लील संभाषण करत असल्याचे दिसत आहे. नेमकं सत्य काय?



इम्रान खान यांची ऑडिओ क्लिप लीक
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमधील सय्यद अली हैदर या पत्रकाराने इम्रान खान यांची ऑडिओ रेकॉर्डिंग यूट्यूबवर अपलोड केली आहे. ही ऑडिओ क्लिप पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयातील असल्याचा दावाही केला जात आहे. मीडिया रिपोर्टमध्ये असा दावाही केला जात आहे की, ज्या महिलेसोबत संभाषण रेकॉर्ड करण्यात आले आहे, ती महिला त्यांच्याच पक्षाची नेता तसेच मंत्री आहे.



पाकिस्तानी पत्रकाराकडून अपलोड 
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नव्या वादात सापडले आहेत. व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये एक पुरुष एका महिलेशी 'अश्लील संभाषण करत असल्याचे ऐकू येत आहे. ही ऑडिओ क्लिप इम्रान खान यांची असल्याचा दावा केला जात आहे. त्याचबरोबर इम्रान खान यांनी ही ऑडिओ क्लिप बनावट असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ म्हणजेच पीटीआयने म्हटले आहे की, इम्रान खान यांचे विरोधक त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी हे कृत्य करत आहेत. 



सोशल मीडियावर ट्रोल


ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच इम्रान खान यांच्यावर हल्लाबोल झाला. पाकिस्तानी महिला पत्रकार नाइला इनायत यांनी ट्विटरवर लिहिले की, "इम्रान खान आता इम्रान हाश्मी झाले आहेत." निवृत्त भारतीय संरक्षण विश्लेषक मेजर गौरव आर्य यांनीही याचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, "पाकिस्तानमधील एका व्यक्तीने मला सय्यद अली हैदर ऑफिशियल नावाच्या यूट्यूब चॅनलवरून एक व्हिडिओ पाठवला होता, जो पाकिस्तानी पत्रकार चालवतो. ही ऑडिओ क्लिप इम्रान खान यांचीच आहे.


यापूर्वीही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल


याआधीही इम्रान खान यांचे कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. ऑक्टोबरमध्ये, इम्रान खान यांचा एक कथित ऑडिओ समोर आला होता, ज्यामध्ये ते संसदेतील अविश्वास ठरावातून खासदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत होते. इम्रान खान यांच्याशी संबंधित आणखी एक ऑडिओ क्लिप लीक झाली होती. ज्यामध्ये ते मार्च 2022 मध्ये वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानच्या राजदूताने पाठवलेल्या गुप्त संदेशाविषयी बोलताना ऐकले होते, ज्यामध्ये त्यांना सत्तेवरून हटवण्याची योजना होती.