Pakistan PM on Economy : आगामी काळात वाढती महागाई पाहता दोन महिन्यांत पाऊले उचलावी लागतील, असा खुलासाही पाकिस्तान सरकारने केला आहे. 


Pakistan Financial Crisis : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी देश चालवायला पैसा नसल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तानला दुसऱ्या देशांकडे मदतीसाठी अबलंबून राहावं लागत आहे. पाकिस्तान सरकारच्या महसूल बोर्डाच्या पहिल्या ट्रॅक आणि ट्रेस यंत्रणेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात इम्रान खान यांनी जनसंबोधन केलं. यावेळी देश चालवण्यासाठी पाकिस्तानकडे पुरेसा पैसा नसल्याची कबुली इम्रान खान यांनी दिली आहे. कर संकलनातील व्यत्यय आणि वाढतं परदेशी कर्ज हा सध्या पाकिस्तानचा राष्ट्रीय मुद्दा बनल्याचं इम्रान खान यांनी सांगितलं आहे. 


आर्थिक दिलासा मिळण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची मदत घेण्यासही तयार
पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे पाकिस्तानी जनतेपुढील संकटे आणखी वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नं पाकिस्तानसाठी सहा अब्ज डॉलरचे बेलआउट पॅकेज देण्यास सहमती दर्शवली होती. या पॅकेजसाठी आवश्यक तरतुदी खर्च कमी करणे आणि कर वाढवणे पाकिस्ताननं मान्य केल्या आहेत. दरम्यान, वाढत्या महागाईमुळे पुढील दोन महिन्यांत पाऊले उचलावी लागतील, असा खुलासाही यावेळी पाकिस्तान सरकारनं केला आहे. 


पाकिस्तानी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार शौकत तारीन यांनी आगामी काळात उद्भवणाऱ्या कठीण परिस्थितीची माहिती दिलीय. यावेळी त्यांनी सागितलंय की, ''महत्त्वाचे राजकीय भांडवल तर वापरले जाईलच, पण महागाईची आणखी एक लाटही येईल. पाकिस्तानी महसूल बोर्डाचं कर संकलनाचं लक्ष्य वाढवून सुमारे 300 अब्ज रुपये करण्यात आलंय. यासाठी पाकिस्तान सरकारला संसदेत स्टेट बँक ऑफ पाकिस्तान संशोधन विधेयकाला मंजुरी द्यावी लागेल.''


तारीन यांनी पुढे सांगितलंय की, काही महिन्यांनी विजेच्या दरातही वाढ करण्यात येईल, जो दर सध्या 50 पैसे प्रति युनिट आहे. मात्र, हे कर्जाच्या पातळीवर ठरवले जाईल, असंही तारीन यांनी स्पष्ट केलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


एक व्यथा अशीही... तब्बल 43 वर्षे तुरुंगात काढल्यानंतर झाली निर्दोष मुक्तता!


Pfizer ची कोरोना लस 12 ते 15 वयोगटासाठी चार महिन्यांनंतरही प्रभावी, कंपनीचा दावा


Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीचा प्रकार म्हणजे चीट फंड सारखा, लवकरच फुगा फुटणार; रघुराम राजन यांचा इशारा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha