India Vs Pak: पाकिस्तानची(Pakistan) आर्थिक(Financial) परिस्थिती सध्या फारच बिकट आहे. अगदी रोजच्या वापरासाठी असलेल्या वस्तू मिळवण्यासाठी देखील लोकांना फार कष्ट करावे लागत आहेत. पण असं असलं तरीही पाकिस्तानी लष्कराचा हेकेखोरपणा कमी होताना दिसत नाही. पाकिस्तानाविरोधात भारत कायमच वरचढ ठरला आहे. तरीदेखील पाकिस्तानकडून भारताविरुद्ध कारस्थानं सुरू असतात. आता तर पाकिस्तानने भारताला चक्क ताकीद दिली आहे.
पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल अहमद शरीफ यांची पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी अहमद शरीफ यांनी त्यांची पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भारताला सक्त इशारा दिला आहे. भारताने पाकिस्तान विरोधात काही हालचाली करण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तान त्याच भाषेत उत्तर देईल असं पाकिस्तनाच्या लष्करी प्रवक्त्यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानने भारताला दिलेला हा इशारा म्हणजे युद्धाची तर नांदी नाही ना असा प्रश्न आता पडत आहे. पाकिस्तानने यापूर्वी केलेल्या कुरघोड्यांना भारताने सडेतोड उत्तर दिले आहे.
पाकिस्तान त्याच भाषेत उत्तर देईल...
अहमद यांनी सांगितले की 'जर भारत जर पाकिस्तानाविरोधात काही हालचाली करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला पाकिस्तान त्याच भाषेत उत्तर देईल याबाबत कोणतीही शंका नाही'. यापुढे ते म्हणाले की,'जर वेळ पडली तर आम्ही शत्रूच्या भागात जाऊन देखील उत्तर देऊ.'असं देखील त्यांनी म्हटले. त्यामुळे आता पाकिस्तान भारताविरोधात पावले उचलणार का, याकडे लक्ष लागलं आहे.
'पाकिस्तानात दहशतवाद संपवून टाकणार' ...
दहशतवाद ज्या देशात नांदतो त्याच देशानं दहशतवाद संपवून टाकण्याचं विधान केलं आहे. फक्त भारतालाच नाही तर दहशतवाद्यांना देखील पाकिस्तानने सक्त ताकीद दिली आहे. अहमद यांनी पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना देखील इशारा दिला आहे. पाकिस्तानात दहशतवाद संपवून टाकणार असल्याचंही अहमद यांनी सांगितलं. या वर्षभरात 1535 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्यामुळे पाकिस्तानात कोणताही 'नो -गो एरिआ' राहीला नाही, असा दावाही त्यांनी केला.
पाकिस्तानी लष्कराचे अहमद 22 वे प्रवक्ते...
अहमद यांना अहमद चौधरी देखील म्हणतात. अहमद हे पाकिस्तान लष्कराचे जनरल आहेत. 6 डिसेंबर 2022 रोजी त्यांची पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली.