काश्मीरप्रश्नावर भारतच गंभीर भूमिका घेत नसल्याचा आरोप आसिफ यांनी केला आहे. भारताविरोधात अनेक पुरावे पाकिस्तानकडे आहेत, ज्यावरुन भारताची दुटप्पी भूमिका दिसून येते, अशी मुक्ताफळे आसिफ यांनी उधाळली.
परराष्ट्र मंत्री सुष्मा स्वराज यांनी केलेल्या भाषणाने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा चेहरा उघडा पडल्याने त्यांचं भारतावर आरोपसत्र सुरु झालं आहे. यापूर्वी आसिफ यांनी एका टीव्ही मुलाखतीत भारतावर आण्विक हल्ला करण्याची धमकी दिली होती.
जागितक पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. त्यावरही आसिफ यांनी टिप्पणी केली. भारताला पाकिस्तानवर आरोप लावून कोणत्याही देशाचं समर्थन मिळालेलं नाही. याऊलट पाकिस्तानला चीनने जाहीर पाठिंबा दिला आहे, असं आसिफ यांनी सांगितलं.
पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये मोहीम राबवली आहे. पण काही ठराविक देशांच्या पाठिंब्यामुळे पाकिस्तानला दहशतावादी राष्ट्र घोषित केलं जाऊ शकत नाही, असंही विधान आसिफ यांनी केलं.