इस्लामाबाद : काळ्या पैशाचा बंदोबस्त करण्यासाठी पाकिस्ताननेही भारताकडून धडा घेतल्याचं चित्र आहे. पाकिस्तानच्या संसदेत 5000 रुपयांची नोट चलनातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव बहुमताने पारित करण्यात आला आहे.
पाकिस्तानमध्ये काळा पैसा रोखण्यासाठी 5000 रुपयांची नोट बंद करण्यात येणार आहे. भारताने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर दीड महिन्यातच पाकिस्तानने हे पाऊल उचललं आहे. मुस्लीम लीगचे उस्मान सैफुल्लाह खान यांनी हा प्रस्ताव मांडला, जो बहुमताने पारित करण्यात आला.
पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'ने हे वृत्त दिलं आहे. 5000 रुपयांची नोटी रद्द केल्याने बँक व्यवहाराला चालना मिळेल, तसेच काळ्या पैशावर टाच आणण्यासाठीही या निर्णयाचा फायदा होईल, असं या प्रस्तावात म्हटलं आहे.
दरम्यान पाकिस्तानमध्ये भारताप्रमाणे एकदाच नोटाबंदी करण्यात आलेली नाही. 3 ते 5 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने नोटाबंदी करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे देशात आर्थिक संकट निर्माण होईल, असं पाकिस्तानचे कायदा मंत्री झाहिद हमीद यांनी म्हटलं आहे.